गोसावी समाजाच्या समाधीस्थळ

गोसावी समाजाच्या समाधीस्थळांची तोडफोड

By admin | Published: October 13, 2016 12:25 AM

कोंडेश्वर मार्गावरच्या गोसावी समाजाच्या स्मशानभूमीत असणाऱ्या समाधी ओट्यांची तसेच मुर्त्यांची काही समाजकंटकांनी तोडफोड केली.

Open in App

कोंडेश्वर मार्गावरील प्रकार : पोलिसांत तक्रार दाखलबडनेरा : कोंडेश्वर मार्गावरच्या गोसावी समाजाच्या स्मशानभूमीत असणाऱ्या समाधी ओट्यांची तसेच मुर्त्यांची काही समाजकंटकांनी तोडफोड केली. यातून भावना दुखावल्याने समाज बांधवांनी बुधवारी १२ आॅक्टोंबर रोजी घडलेल्या प्रकाराची बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहे. कोंडेश्वर मार्गावरील वृद्धाश्रमालगतच गत ५० वर्षापूर्वीपासून गोसावी समाजाची स्मशानभूमी आहे. जिल्ह्यातील समाजबांधव मृत व्यक्तींवर येथेच अंत्यसंस्कार करतात. मृत व्यक्तीच्या ठिकाणी समाधीस्थळ म्हणून ओटे बांधण्यात आले आहे. त्या ओट्यांवर मूर्त्या ठेवण्यात आल्यात. दसऱ्याला गोसावी समाजातील मृत व्यक्तींचे स्मरण म्हणून मोठ्या संख्येत समाजबांधव या ठिकाणच्या स्मशानभूमीत येतात. मंगळवारी दसऱ्यानिमित्त आलेल्यांना सदर बाब दिसून पडली. घडलेल्या प्रकाराने समाजबांधवांच्या भावना दुखावल्या. संजय पुरी, प्रवीण गिरी, प्रशांत गिरी, अमोल गिरी, किशोर गोसावी, दीपक पुरी, महादेव गिरी, श्याम भारती, प्रदीप भारती, मुकेश गिरी, राजू गिरी यासह इतरही समाजबांधवांनी बडनेरा पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची लेखी तक्रार दिली. तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांचा शोध लावावा, अशी मागणी त्यांनी केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मेहेत्रे हे पोहोचले होते. श्वान पथकही बोलविण्यात आले होते. पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहे. ही स्मशानभूमी मोकळ्या जागेत आहेत. स्मशानभूमीला संरक्षण भिंत नाही. या स्मशानभूमीत झुडूपी वाढली आहे. एकूण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्मशानभूमीला कम्पाऊंड असणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)

Comments

Popular posts from this blog

रत्नापूर गावातल्या शिलालेखासंबंधी संशोधन होणे गरजेचे

महार

इनाम आणि वतन जमिनी