रत्नापूर गावातल्या शिलालेखासंबंधी संशोधन होणे गरजेचे


परंडा हे पुर्वी निजाम सरकारची मोठी राजधानी होती. मुनिमखान औरंगाबादीच्या एका पत्रानुसार मोगल काळात परंडा जिल्ह्यात १९ तालुके व ६२१ गावांचा समावेश होता. सुस्थितीत असलेला येथिल भुईकोट किल्ला अनेक रहस्य आपल्या पोटात घेऊन दिमाखात उभा असल्याचे दिसते.

बिरोबा मंदिर

Ratnapur, Maharashtra 413505

बिरोबा मंदिर

याच मंदिरासमोर खालील शिलालेख आहे. त्यावर डाव्या बाजुला नागाचे चिन्ह आहे. शिलालेखाचे शिर्षक सुर्य चंद्राचे चिन्ह असल्यागत दोन गोल आहेत. उजव्या बाजूच्या गोला शेजारी अर्धगोल आहे. तेरा ते चौदा ओळी आहेत. पुर्वी शिलालेखाच्या शेजारीच वारूळ असायचे. गावातील बायका सणासुदीला या शिलालेखालाही पुजायच्या.

या शिलालेखाची जसेच्या तसे काढलेली नक्कल

रत्नापूर येथे जुन्या वाडयांवर अनेक चिन्हे कोरलेली आहेत.

परंतु यापेक्षाही जास्त कुतुहल मला येथिल दोन शिलालेखांचेच आहे.

शके१६७६ नाम संवंतर यापुढे मलाही कांही समजेना एकूण १५ते१६ ओळीच एक शीलालेख तर अडीज ओळींची दुसरी शिलालेख कान्होबाच्या माळावर आहे.

या कान्होबाच्या माळावर असलेल्या शिलालेखाचा मी पाहणी करत असलेला सुगावा माझे आजोबा कै. अजिनाथ अर्जुन सरवदे यांना लागताच माझ्यावर रागवले.

जागा चांगली नाही. कशाला दुसऱ्यांच्या धनाची अपेक्षा करू नाही. कष्टाचं मिळेल तिच अर्धीकोर चरणी भाकरी खावी. समाधानी राहावं. तिकडे जावू नकोस. ती जागा जीव घेती. वगैरे वगैरे या त्यांच्या नेहमीच्या उत्तराला मी पुरता वैतागलो होतो.

म्हणून तिथे वारंवार जाऊन त्या दिवशी मी आजोबांना बोलते केले. १४ ऑगस्ट२०१३ ला मी इतिहासाची फक्त आवड असल्यानं पुरावे गोळा करण्याचा छंद जोपासू लागलो.

आजोबांव्यतिरिक्त त्यांच्या समवयस्क लोकांच्या मुलाखतीही मी घेतल्या, रेकॉर्ड केल्या. परंतु दुर्दैवाने प्रवासात कुठेतरी गहाळ झाल्या.

कान्होबाचा माळ

अख्यायिका

याविषयी आमुचे आजोबा सांगायचे की भावकीतल्या साधू सुदाम सरवदे यांचे मेव्हणे मारूतीबुवा वंजारे,बीड हे जुने शिक्षित, सुसंस्कृत ग्रहस्थ पोथी पुराणे यांचे वाचन करणारे. नित्यनियमित गुजराच्या (गुज्जर) विहिरीवर अंघोळीला जायचे.

एकदा अंघोळ करत असताना त्यांना विहिरीजवळ कान्होबाच्या माळाविषयीचा कांहीतरी संदर्भ वाचायला मिळाला.

या आधी गावातल्याच मचिंदर आडनावाच्या इसमाने कान्होबाच्या माळावरुन धन आल्याची चर्चा होती. (त्यावेळी)

त्यांनी कान्होबांच्या माळावर गेल्यावर तिथे एका शिळेवर लिहिलेला मजकूर वाचला तेंव्हा त्यांना जाणवले की तो मजकूर बदलतो आहे. आणि क्षणात ती शिळा पलटी होऊन त्याखाली तळघरात जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या.

मारूतीबुवा तळघरात गेले. तिथे त्यांना अफाट धनदौलत असलेले मोठ्ठाले हंडे, पेटया दिसल्या, ऋणीमूनी दिसले. शिवाय दोन स्त्रिया ज्यांची नावे रत्निका ( रत्ना ) आणि मल्लिका स्वागत करताना दिसल्या.

मारूतीबुवा आणि त्यांच्यात संवाद झाला. मारूतीबुवा अत्यंत भयभित होऊन अंघोळ केली नसल्याचे शिवाय मटन खाल्याचे कारण सांगून त्या तळघरातून बाहेर आले.

पुढे सहा महिने ते आजारी पडले. आणि रक्ताची गुळणी (उलटी) होऊन मरण पावले. विशेष म्हणजे या गोष्टीला गावातले आजोबांच्यावयाचे सर्वजण दुजोरा देतात.

निश्चित कोणती शिळावरील लेख मारूतीबुवा यांनी वाचला हे सांगता येणार नाही परंतु मी स्वतः तिथे पाहिले तेंव्हा अडीज ओळी असलेला दगड आढळला. शिवाय तो आम्ही दोघांनी उचलूनही पाहिला ना रस्ता ना तळघर.

हाच तो दगड

त्या कान्होबाच्या माळावर असलेल्या शिळेवरचा मजकूर मी जसंच्या तसा उतरवला.

माझी खुप इच्छा होती यावर योग्य ते संशोधन व्हावे. परंतु या अनाकलनीय भाषेचा अडसर मध्ये येत होता. गावाचा इतिहास डोळयांपुढे असूनही वाचता येत नाहीय याचेच वाईट वाटते.

सहकार्य अपेक्षित.

आपलाच,

सुमित रवि सरवदे.

Comments

Popular posts from this blog

महार

इनाम आणि वतन जमिनी