महार
महार समाज बारा बलुतेदारपैकीच एक होता
सुतार लोहार चांभार महार मांग कुंभार न्हावी धोबी गुरव जोशी भाट मुलानी हे बारा बलुतेदार होते
सोनार जंगम शिंपी कोळी तराठ/येसकर माळी/बागवान डवरी गोसावी घडसी रामोशी तेली तांबोळी गोंधळी हे बारा अलुतेदार होते
लिस्ट चा संदर्भ :- History of Marathas - Grant Duff
छत्रपती च्या सेनेमध्ये जातीप्रथा नव्हती सर्व लोक स्वराज्यासाठी आपल्या परीने मदत करत होते.महार लोकांना महाराजांनी गडांच्या बाहेर गडांची सुरक्षा करणे शत्रूची माहिती गडावर पोहचवणे छुपे मार्ग तयार करणे आणि त्यांची काळजी घेणे अशी कामे सोपवली होती.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
महार (तत्सम जाती: मेहरा, मेहर, महारा, तरल, तराळ, धेगुमेग) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात राहतो. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य (दलित) मानले गेले होते. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ११% ते १५% महार आहेत.[२]महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, ओरिसा, तेलंगणा या राज्यांत महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण ३० राज्यांत हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यांत महार समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे.[३][४]भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातही महार हे कमी संख्येने आहेत.[५][६] आज बहुतांश महार हे बौद्ध धर्मीयआहेत.
| महार |
|---|
| A Mahar Man winding thread from The Tribes and Castes of the Central Provinces of India (1916) |
| एकूण लोकसंख्या |
१ ते १.५ कोटी |
| लोकसंख्येचे प्रदेश |
| प्रमुख महाराष्ट्र इतर लक्षणीय लोकसंख्या |
| भाषा |
| मुख्यः- मराठी व वऱ्हाडी |
| धर्म |
| बौद्ध धर्म (नवयान) |
| संबंधित वांशिक लोकसमूह |
| मराठी बौद्ध, मराठी लोक |
महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा अर्थ म्हणजेच "महारांची भूमी" असा होय — महार + राष्ट्र = महाराष्ट्र. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य मातृभाषा मराठी आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्रा व देशाबाहेर गेले आहेत. मराठा-कुणबी(सुमारे ३०%) समाजानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या महार-बौद्ध समाजाची आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
इतिहास
महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही.
जागल्या म्हणजे पहारेकरी हा बहुधा महार जातीचा असे. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहीत म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराकडे वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे हे काम असे.
महार या जातीचे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. आर्य लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या, त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.
महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होते. वऱ्हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवच्या सरहद्दी संभाळणे, चौकीदारी व जासुसी इत्यादी कामे असत.[७]
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
उपजाती
महार जातीत १२ उपजाती होत्या. महारांच्या सोमस, लाडवन, बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये हिंदू धर्म त्यागून हा सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणुकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत आणि उपजातींचा हा भेद समाप्त झाला आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धर्म
२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रीय महार हे ५६.२% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि ०.१% शीख होते.[८]
१९५१ मध्ये म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ८०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे 'महार' ही 'हिंदू ओळख' नाकारत बौद्ध झाले तर काही महार जातीने 'महार' व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले. त्यामुळे आज अनुसूचित जातीत महाराष्ट्राचे प्रमाण २००१ मध्ये ५७.५% झाले, व यातील ५८% महारांनी आपला धर्म बौद्ध सांगितला होता.
सुरुवातीला हिंदू धर्मातील अस्पृश्य वर्गात गणला जाणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ नंतर बौद्ध धर्मीय झाला. त्यानंतर ह्या समाजातील बहुतेक लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आले तर अनेकांनी अधिकृतपणे बौद्ध धर्मस्वीकारला.. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत बौद्ध धर्म न स्वीकारलेले फक्त १०% महार आहेत. महाराष्ट्रात महारआणि बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १६% म्हणजेच २ कोटींच्या आसपास आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
महार रेजिमेंट
महार रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक महत्त्वाचे सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. १९४१ मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स 1818 च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. या रेजिमेंट मध्ये मुख्यत्वे महार समाजाचे सैनिक असतात.
इतिहास
भारतीय सैन्याच्या महार रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
महार रेजिमेंटचे विकास-टप्पे
प्राचीन हिंदू राजांच्या सैन्यात प्रसंगोपात्त क्षात्रकर्माला वंचित केलेल्यांना सैन्यात प्रवेश दिला जात असावा, असे राजनीतिप्रबंधा वरून दिसते. मात्र कोट-किल्ल्यांच्या घडणकार्यांत महारांनी बलिदान केल्याचे प्रचलित आहेत. उदा., सायनाक कुटुंब. तसेच कोट-किल्ल्यांच्या तटबंदीबाहेरील चौक्या सांभाळण्याचे कामही त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले आहे. या दृष्टीने सायनाक, भागनाक, रामनाक इ. नावे प्रसिद्ध आहेत. शिवाजी महाराजांच्यासैन्यात महारांना भरती केले जात असे. महार किंवा त्यांच्यासारख्या जातींना मोठ्या प्रमाणावर सैन्यात भरती करण्याची परंपरा यूरोपीयांनी सुरू केली. १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी, कोरेगाव भिमा (जिल्हा पुणे, तहसील शिरुर) येथील दुसरा बाजीराव पेशवा व ईस्ट इंडिया कंपनीयांच्यातील लढाईत महार सैनिकांनी लक्षणीय मर्दुमकी गाजविली. या लढाईत ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८,००० सैनिकांना पराभूत केले होते. इंग्रजांनी तेथे उभ्या केलेल्या विजयस्मारक स्तंभावरील लेखात त्या वीर महार सैनिकांची नावे कोरली आहेत.
पुढे काठेवाड (१८२६), मुलतान (१८४६) व दुसऱ्या आंग्ल−अफगाण युद्धात (१८८०) कंदहार येथील लढायांत आणि वेढ्यांत महार जवानांनी तलवार गाजविली. मुंबईच्या वॉडबी मार्गावरील शिलालेखात तसे नमूद केले आहे. मेजर वॉडबी हा महार सैनिकांचा अधिकारी होता. १८५८ नंतर मुंबई सेनेत १८९२ सालापर्यंत १० ते ११ टक्के सैनिक मांग, रामोशी व ५ ते ६ टक्के इतर जातींचे भरती केले जात. ‘महाबळेश्वर समिती’ (१८९३) च्या शिफारसीप्रमाणे वरील टक्केवारीत भरीव बदल करण्यात आले. १९१७ साली महार जवानांच्याच दोन कंपन्या तैनात करण्यास ब्रिटिश सरकारने हुकूम काढला. जुलै १९१७ मध्ये महारांची १११ वी पलटण उभी झाली; परंतु १९२२ साली ही पलटण विघटित करण्यात आली. त्यानंतर १९२२ ते दुसरे जागतिक महायुद्ध सुरू होईपर्यंत महारांची लढाऊ सैनिकांची भरती होण्याचे थांबले; पण महार जातीच्या पुढाऱ्यांनी नेट धरल्याने प्रारंभी रुग्णसेवा पथकात त्यांची भरती सुरू झाली. सप्टेंबर १९४१ मध्ये भारत सरकारने बेळगाव (कर्नाटक) येथील मराठा रेजिमेंटच्या केंद्रात पहिली (ऑक्टोबर १९४१) व दुसरी (जून १९४२) अशा दोन महार पायदळ लढाऊ पलटणी खड्या केल्या. मराठा पलटणीतील अधिकारीवर्गच या नूतन महार पलटणीकडे देण्यात आला होता. युद्धाचा व्याप वाढल्याने तसेच महार जवानांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानेही त्यांच्या आणखी पलटणी उभ्या झाल्या. या पलटणींनी हिंदुस्थानचे सीमासंरक्षण केले. तसेच जपानी सैन्याविरुद्ध इंफाळ, आराकन (म्यानमार) येथील लढायांत उत्तम कामगिरी बजावली. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी वरील पायदळी पलटणींचे मध्यम पलटणीत रूपांतर करण्याचा निर्णय तत्कालीन सरसेनापती जनरल क्लॉड ऑकिन्लेक यांनी घेतला. तद्नुसार मद्रास रेजिमेंटच्या साहाय्याने इ.स. १९४७पर्यंत तीन पलटणींच्या मशीनगन पलटणीत रुपांतराचे काम पूर्ण झाले. इ.स. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या सीमासंरक्षणासाठी ‘पूर्व पंजाब सीमादल’ नावाच्या तीन पलटणी उभ्या करण्यात आल्या. त्यांमध्ये शीख, जाट व डोग्रा यांच्या एकोणीस जातींच्या जवानांची भरती झाली. मे १९५६ मध्ये जनरल शंकरराव थोरात यांच्या सूचनेप्रमाणे महार रेजिमेंटला महार मशीनगन रेजिमेंट (सीमा) असे नाव देण्यात आले. डिसेंबर १९५९ ते ३० एप्रिल १९७० या कालात रेजिमेंटमध्ये नऊ पलटणींची (७ ते १५ क्रमांकाच्या) भर पडली. जानेवारी १९६१ मध्ये छत्रीधारी मशीनगन कंपनी उभी झाली. सप्टेंबर १९६३ मध्ये मशीनगन पलटणी रद्दबातल करण्यात आल्याने महार (मशीनगन) रेजिमेंटचे पायदळ रेजिमेंटमध्ये रूपांतर झाले.[१]
महार रेजिमेंट-केंद्रे
या रेजिमेंटमध्ये भरती झालेल्या जवानांना सैनिक शिक्षण देण्यासाठी व रेजिमेंटच्या व्यवस्थापनासाठी [भरती, पगारहिशेब, वैयक्तिक सैनिकदप्तर (पर्सोनेल रेकार्ड)] प्रथम १९४२ मध्ये कामठी नागपूर, १९४६ अरणगाव अहमदनगरआणि १९४६ अखेर सागर मध्य प्रदेश येथे रेजिमेंट-केंद्रे स्थापण्यात आली. सागर येथे पलटणींच्या अधिकाऱ्यांच्या वार्षिक सभा भरतात. त्यांमध्ये सैनिक-कार्यक्रम, शिक्षणपद्धती, गणवेष, सैनिकी कल्याण इत्यादींवर चर्चा होते व त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे शिफारसी केल्या जातात. १९४७ साली तत्कालीन मुंबई प्रांत सरकारने या केंद्राल २५,००० रूपयांचे अनुदान दिले होते.[२]
कामगिरी
महार रेजिमेंट पहिल्या महायुद्धात सहभागी नव्हती. दुसऱ्या महायुद्धात पठाणी टोळ्यांच्या व इतरांच्या आक्रमणापासून हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीचे संरक्षणकार्य यांनी पार पाडले; इराकमध्ये अरब लुटारुंचा बीमोड केला. हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी सव्वा लक्ष मुसलमानांना होऊ घातलेल्या पाकिस्तानकडे त्यांनी पाकिस्तानात जाण्यास सोबत केली. क्वेट्टा शहरामध्ये मुसलमान दंगलखोरांचे पारिपत्य केले व बलुचिस्तानातील हिंदू, शीख आणि इतर मुसलमानेतरांना भारतात आणून सोडले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७-४८च्या भारत पाकिस्तान युद्धातील जांगारे येथील भीषण लढाईत २४ डिसेंबर रोजी शेकडो पाकिस्तानी सैनिकांना व पठाणी घुसखोरांना त्यांनी ठार केले. या लढाईत महार रेजिमेंटची तुकडी गारद झाली. या तुकडीचे नेते हवालदार रावू कांबळे व नाईक बारकू कांबळे होते. नौशहर, उरी, चकोथी, टिटवाल, द्रास, कार्गिलयेथील लढायांत महार पलटणींनी लक्षणीय कार्य केले.; १९५३ मध्ये कोरिया युद्धसमाप्तीनंतर युद्धबंद्यांच्या अदलाबदलीचे कार्य पार पाडण्यात साठी जनरल थोरातांच्या नेतृत्त्वाखाली तिसरी महार पलटणी तैनात होती. जून १९६० मध्ये बेल्जियन कॉंगो स्वतंत्र झाल्याबरोबरच तेथे यादवी युद्धसुरू झाले. संयुक्त राष्ट्रसंघटनेने युद्ध थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटना सेना निर्माण केली. त्या सेनेत महार रेजिमेंटची एक कंपनी होती. कॉंगोच्या कटांगा प्रांतातील लढाईमध्ये निर्भयतेने व निःपक्षपातीपणे काम केल्याबद्दल कंपनीच्या एका अधिकाऱ्याला वीरचक्र हे सैनिकी पदक देण्यात आले.
गोवा मुक्तिसंग्रामामध्ये (१९६१) महार रेजिमेंटच्या छत्रीधारी कंपनीने भाग घेतला होता. १९६२ साली चिनी आक्रमणालाऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महार पलटणींनीच चुशूल, दौलतबेगोल्डी (लडाख व अक्साई चीन) आणि कार्मेग विभाग (ईशान्य भारत) या ठिकाणी प्रतिकार केला. त्यासाठी हवालदार गोविंद कांबळे यांना वीरचक्र मिळाले. १९६५ च्या पाकिस्तान आक्रमणाच्या वेळी कच्छ रणातील सरदारचौकी व व्हिगोकोट येथील लढायांत महार रेजिमेंट लढली. त्याप्रसंगी हवालदार भिंगारदिवे यांना वीरचक्र मिळाले. सप्टेंबर १९६५ मध्ये काश्मीरातील संबा, जोरियान, खेमकरण, अस्सल उत्तर इ. लढायांत महार पलटणी शामिल होत्या. खेमकरणच्या लढाईत महार पलटणींनी भयंकर नुकसान सोसले.
१९७१ सालच्या पाकिस्तानी आक्रमणातही महार पलटणी बांगलादेश, पंजाब व काश्मीर येथील लढायांत सहभागी होत्या. हरहरकलान, पर्वतअली, कैयान, शेजरा, ठाणपीर आणि बांगला देशात शमशेरनगर, मौलवी बाझार, सिल्हेट, बेलोनिया व चट्टग्राम सह अनेक लढायांत या रेजिमेंटने शत्रूचा बीमोड केला.
निरनिराळ्या लढायांतील पराक्रमी वर्तणुकीबद्दल नाईक कृष्णा सोनावणे, कर्नल गुरुबक्षसिंग, नाईक अनसूयाप्रसाद (मरणोत्तर) यांना महावीर चक्र, बावीस जवान व अधिकाऱ्यांना वीरचक्र आणि मेजर जनरल व्यंकट कृष्णराव यांस परमविशिष्ट सेवापदक असे सैनिकी सन्मान मिळाले आहेत.
सैनिकी परंपरेप्रमाणे (१९४९ ते १९६१) रेजिमेंटचे पहिले कर्नल लेफ्टनंट-जनरल शंकरराव थोरात होते; तर दुसरे कर्नल लेफ्टनंट जनरल कृष्णराव हे होते.
स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर रेजिमेंटच्या बॅजमध्ये असलेला ‘कोरेगाव’ हा शब्द आणि ‘कोरेगाव विजयस्तंभ’ ही प्रतिमा प्रदर्शित करण्याचे बंद करण्यात येऊन त्या जागी ‘यश-सिद्धी’ हा कार्यवाचक शब्द व ‘खंजीर’ हे शौर्यदर्शक प्रतीक घालण्यात आले. ‘‘ऐसा देश कभी न देखा, कभी न सुना है। देशों का सरताज, यह भारत देश हैं’’।। हे धृपद असलेले गाणे रेजिमेंटचे संचलन-गीत आहे.तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गिरी यांच्या हस्ते रेजिमेंटला ३ फेब्रुवारी १९७० रोजी राष्ट्रपती ध्वज प्रदान करण्यात आला. ह्याच दिवशी पंधरावी पलटण सोडून इतर चौदा पलटणींना राष्ट्राध्यक्षांनी पलटण पताकाही प्रदान केल्या. पंधरावी पलटण या नंतर उभारलेली असल्यामुळे तिला पताका दिलेली नाही.[३]
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
महार या विषयावरील पुस्तके
- खानदेशातील महार संस्कृती (रा.शे. साळुंके)
- भारतीय जातिसंस्थेत मातंगाचे स्थान आणि महार-मांग संबंध (प्रा. बी.सी. सोमवंशी)
- महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप (संजय सोनवणी)
संदर्भ आणि नोंदी
- ^https://joshuaproject.net/maps/india/17405
- ^ Fred Clothey (2007). Religion in India: A Historical Introduction. Psychology Press. p. 213. ISBN 978-0-415-94023-8.
- ^ "List of Scheduled Castes : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India". socialjustice.nic.in (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-07. 2018-03-19रोजी पाहिले.
- ^ "Mahar - Dictionary definition of Mahar | Encyclopedia.com: FREE online dictionary". www.encyclopedia.com(इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ Project, Joshua. "Mahar (Hindu traditions) in India" (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ memberj. "महार". ketkardnyankosh.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "Wayback Machine" (PDF). 2012-11-14. 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". archive.org. Officer of the Registrar General. 7 March 2007.
•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°
महार कोण होते?
१. महार समाजाचे वास्तव्य गांवकुसाबाहेर होते.
२. महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती. गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे.
३. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्याची नोंद घेणे, संशयित व्यक्तींना वेशीवर चौकशीसाठी रोखणे हे त्यांचे काम होते.
४. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भभवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे.
५. महारांची स्वतंत्र चावडी असे व तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता.
६. व्यापारी जेव्हा आपले तांडे घेऊन निघत तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त करत.
७. महार हे लढवय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करून महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो.
८. पेशव्यांनीही अंगरक्षक/पहारेकरी म्हणून आधी महारांनाच प्राधान्य दिले होते.
९. महार हे ग्राम/नगर/राज्य परिप्रेक्षात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटलाला वा नगराध्यक्षाला देत असत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा. नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपूर्ण माहिती घेणे व गाव पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते.
१०. महार समाज अस्पृश्य गणला गेलेला होता.
११. महारांवर शेतसारा/खजिना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची तसेच सरकारी आज्ञा/संदेशादीं दळणवळणाचेही काम होते.
सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम पाहता यासाठी पूर्वी अनेक विद्वानांनी व इरावती कर्वेंसारख्या विदुषींनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे. महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही.
मृताहारी (म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गत: मृत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे मृताहारी बुद्ध धर्माच्या इतिहासात अगणित झालेले असतील. त्यांना सर्वांनाच "महार" म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रातच या नावाची जात आहे, म्हणजे महार शब्दाचे मूळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.
महाआहारी (खूप खाणारे) असणार्या लोकांना महार म्हणू लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्क (रॉबर्टसन) मध्ये दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही. दुसरे असे की महार एक जात म्हणून कोणत्याही स्मृती/पुराणांमध्ये उल्लेखिलेली नाही. अस्पृश्यांच्या यादीतही ही जात पुराणांनी व स्मृतींनी नोंदलेली नाही. मनुस्मृतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचु, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गांवाबाहेर रहावे असे म्हटलेले आहे, पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्पृश्य म्हटलेले नाही. तैत्तिरीय ब्राह्मणानुसार व विष्णुस्मृतीनुसार फक्त चांडाळ ही जात अस्पृश्य आहे. त्यामुळे मुळात जन्मभूत अस्पृश्यता भारतात नेमकी कधी आणि का आली हे सांगता येत नाही.
वर्णसंकरातून अस्पृश्य जातींचा विकास झाला हे मनुस्मृतीचे मत मानव वंश शास्त्राने खोटे ठरवले आहे. मनुस्मृतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशूद्र, मेघवाल इत्यादी भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेखही नाही.
याचाच अर्थ ९-१० व्या शतकानंतर (म्हणजे स्मृतिकाळ संपल्यानंतर) कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेलेले दिसते.
मग प्रश्न असा उद्भवतो की "महार" ही मुळात जात होती काय?
महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?
महार समाजातील प्रमुख आडनावांमध्ये अवचट, अहिरे, आडसुळे, आढाव, आराक, इंगळे, उबाळे, कदम, काळफात, कांबळे, काळमात, खैरकर, गायकवाड, झिने, थोरात, पगारे, पवार, पाठारे, मोरे, लोखंडे, बावस्कर, भिंगार, भिलंग, भेडे, भोसले, मोहिते, विवेकर, शिंदे, शेजवळ, शेळके, सपकाळ, सरकटे, साळवे, हिवाळे, इत्यादी आडनावे आढळतात. या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीय बहुजन समाजातही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते, एकच होते. आणि व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा वेगवेगळ्या जाती एकाच समाजघटकांतून कालौघात विभक्त झाल्या. जाती जन्माधारित बनत गेल्याने जातिधर्म आणि समाजधर्मात काहीसे विभाजन झाले.
त्यामुळे महार समाज हा सर्वस्वी स्वतंत्र वंशातून विकसित झाला आहे असे मानता येत नाही. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे...(शिव/विष्णु/विट्ठल/महालक्ष्मी इत्यादी). त्याचबरोबर या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्पृश्यतेच्या काळात अन्य मंदिरात स्थान व प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसित होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहू शकतो. धनगरसमाजानेही ते अस्पृश्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहेत.
म्हणजे महार जातीत सर्वच मानवघटकांतील लोक सामाविष्ट आहेत असे म्हणता येते. कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही. त्या त्या व्यवसाय-सेवाक्षेत्रांचा जसजसा विकास होऊ लागतो तसतसे त्यात अन्य समाजघटकांतील लोक आवडीने वा चरितार्थ प्रवेश करतात व त्यानुसार एक पेशा बनतो. भारतात त्यांना "जात" बनवले गेले.
•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°
महार शब्दाचा उगम
भारतातील बव्हंशी जातींची नावे ही व्यवसायाधारित आहेत. म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारित असला पाहिजे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. त्यासाठी सुरुवातीलाच कथित केलेले महारांचे व्यवसाय पुन्हा एकदा तपासल्यास,
अ. महार हे ग्रामरक्षक होते...चोर्या-दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपू शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. त्यांनाच भूमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच जमिनींच्या तर सीमा ठरतच होत्या पण संरक्षितही रहात होत्या.
ब. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाच्या अखेरीपर्यंत प्रादेशिक व्यापारासाठी, परक्या मुलखात जावे लागे. व्यापारी जाताना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवय्या अशी राहिलेली आहे.
म्हणजेच गावाचे/व्यापार्यांचे "रक्षण" हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.
या दोन मुद्द्यांवरून स्पष्ट दिसते की "महार" हा शब्द "महारक्षक" (वा प्राकृत महारक्खित-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे. जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरून हीच व्युत्पत्ती महार या शब्दाचा उलगडा करते, अन्य कोणतीही नाही हे सिद्ध होते. ही कर्तव्ये तत्कालीन राजकीय अस्थिरता, धामधूम आणि कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जिवंत राहूच शकत नव्हती.
•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°
महार समाजाचा उदय
महार समाजाचा उदय कधी झाला याचे भौतिक/लिखित पुरावे आज अस्तित्वात नाहीत. परंतु समाजेतिहासाचा अंदाज घेतला तर जेव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेव्हाच हा समाज आपल्याच समाजातून लढवैय्या व्यक्तींना नागर रक्षणासाठी नियुक्त करतो. युद्धातील सैनिक आणि नगर रक्षक यांत मूलभूत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रुसैन्यावर तुटून पडण्याचे काम असते. परंतु ग्रामरक्षकाला मात्र तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. शत्रूरुच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव/शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधु काळापासूनची आहे. रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, उशिरा लागेल म्हणून केव्हातरी रक्षकांनी गाव/शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण म्हणजे तत्कालीन अर्थव्यवस्था ही मुख्यत: कृषिप्रधान होती व शत्रू नगरांवर/गावांवर आक्रमण करतांना प्रथम शेते जाळतच येत असे. ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात होती हे तर सर्वविदित आहेच. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत असल्याने वेशीबाहेर या बहाद्दर असणार्या रक्षकांची वसती केली गेली असावी असे वाटते. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख "महारक्षक" पद भूषवीत असणे स्वाभाविक आहे, परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तित झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली व संक्षेपाने तीच जात महार म्हणून ओळखली जाऊ लागली असे दिसते. (मराठा जातीचाही कसलाही उल्लेख श्रुति-स्मृति-पुराणांत मिळत नाही त्याचे हेच कारण आहे.)
महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवून ठेवले असेल याचे हेच कारण आहे की परंपरागतच मुख्यत: संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवैय्येपणा, चिकाटी हे मूलभूत गुण त्यांच्यात होते आणि वेळोवेळी ज्ञात इतिहासातही त्यांनी हे गुण दाखविले आहेत. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करून त्यांनी हजारो वर्ष जे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खालील मुद्दे पाहिल्याखेरीज लक्षात येणार नाही.
१. तत्कालीन स्थितील प्रत्त्येक गावाभोवती तटबंदी/कोट असत व रात्री मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण म्हणजे सत्ता कोणाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय सातत्याने आक्रमणे/परकीय आक्रमणे वाटेत येतील त्या गावांत लुटालूट-जाळपोळ हा आक्रमकांचा (आणि दरोडेखोरांचाही) प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहून गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र जिवाचा धोका पत्करून उघड्यावर स्वत: व स्वत:चे कुटुंबे असुरक्षित ठेवत गावांचे रक्षण करत राहिली आहेत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते...अशा वेळीस प्राणांचे बलिदान त्यांना द्यावे लागले असणार.
. २. महार समाज प्राय: गरीबच राहिला आहे. उघड्यावर रहात असल्याने संपत्तीसंचय करूनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालून करत तेच गाव त्यांना स्वत: लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते, पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत ज्ञात इतिहासातही दिसत नाही.
३. जमिनीचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत, एवढे या त्यांच्या साक्षीचे महत्त्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाड्यांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे उदाहरण नाही.
४. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा गायब केल्याचेही उदाहरण नाही.
५. महार समाजावर अस्पृश्यता लादली गेली, अन्याय्य बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असूनही त्याने आपल्या गावाविरुद्ध/व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलले नाही.
या काही मुद्द्यांवरुन अखिल समाजाने महार समाजाबाबत किती कृतज्ञ असले पाहिजे हे लक्षात येईल.
•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°
अवनती कशी व का झाली?
महार समाजाला नेमके कधी अस्पृश्य ठरवले गेले याबाबत इतिहास मूक आहे. या समाजाची आर्थिक व सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली हे पुराव्यांअभावी ठरवता येणे अवघड आहे. परंतु तर्काने या प्रश्नांचा उलगडा होऊ शकतो.
१. गावाचे रक्षण करणार्यांना, आणि जे आधी सर्वच समाजघटकांतून आले होते त्यांना आरंभापासून अस्पृश्य मानले गेले असण्याची शक्यता नाही.
२. ज्या काळात भारतांतर्गतचा व विदेशी व्यापारही भरात होता तेव्हा त्या व्यापारी तांड्यांचे रक्षण करणार्या महाराष्ट्रातील महारांना अस्पृश्य मानले जात असण्याची शक्यता नाही. किंबहुना ८व्या शतकापर्यंतच्या स्मृतीही महारांचा अस्पृश्य म्हणून निर्देश करत नाहीत.
असे असले तरी महार समाजाची हळूहळू सामाजिक पातळीवर अवनती होत गेली, त्यांच्या सर्व जबाबदार्या पूर्ववत तर ठेवल्याच, पण त्यांत अमानुष वाढ केली गेली. त्यामुळे महारांचे कंबरडे मोडले नसले तरच नवल. [१]यामागील कारणांचा वेधही घेणे अत्यावश्यक आहे.
१. अखिल समाजाची आर्थिक अवनती: पुराणांनी लागू केलेली समुद्रउल्लंघनबंदी. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळला. पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थाही संकुचित झाली. यादवकालापर्यंत तरी आपण तुलनेने बरे असलेले स्थैर्य पहातो. परंतु तरीही आंतरराज्यीय व्यापार मात्र उत्तरेकडील धामधुमीने संपत गेला.
अस्थैर्याच्या कालात व्यापाराला फटका बसतो तसेच पर्यायाने तो स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बसतो. उत्पादक घटक आपले उत्पादन सीमित करत नेतात. जेवढी मागणी तीही स्थानिक, वा परिसरातील, तेवढेच उत्पादन करू लागतात. सेवाक्षेत्रावर त्याचा पहिला आघात होत असतो. महार समाज हा सेवाघटक असल्याने त्यांच्यावर सर्वात आधी आघात होणे स्वाभाविक आहे.
इ.स. १२-१३ व्या शतकाच्या काळात कधीतरी बलुतेदारी पद्धत सुरू झालेली दिसते. ती नवीन अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्षात अपरिहार्य मानली, आणि तिचा फटका सर्वच घटकांना बसला असला तरी सर्वाधिक फटका महारांना बसला हे उघड आहे. कारण वस्तु निर्मात्यांना किमान एक दृश्य अस्तित्व असते. ते भौतिक गरजांची पूर्ती करत असतात. म्हणजे शिंपी कपडे शिवत असतो तर सुतारशेतीउपयोगी वस्तू निर्माण/दुरुस्त करत असतो. परंतु ग्रामरक्षण ही अदृश्य सेवा असते. भरभराटीच्या काळात जेवढी या सेवेची गरज भासते तेवढी एकुणातीलच आर्थिक अवनतीच्या काळात भासणे असंभव होते. हे समाजमानसशास्त्र येथे समजावून घ्यायला हवे. त्यामुळे शेतीउत्पादनातील (जेही काही असेल ते) सर्वात कमी वाटा महारांना दिला जात असे हे अगदी बिदरच्या बादशहाने विठू महाराशी केलेल्या बावन हक्काच्या सनदेतूनही पाहू शकतो. (खरे तर ही सनद म्हणजे महारांच्या स्वातंत्र्याची नव्हे तर बेड्या घट्ट करणारी सनद होती हे नाइलाजाने म्हणावे लागते.)
व्यापार थांबल्याने व्यापरी तांड्यांचे रक्षण आपसूक थांबले. म्हणजे तोही उत्पन्नाचा स्रोत संपला.
म्हणजे अल्प बलुते, अन्य उत्पन्नाचा अभाव आणि अनउपजाऊ इनामी जमिनी यांतून होणारा एकत्रित परिणाम म्हणजे महार समाजाची आर्थिक स्थिती रसातळाला जाऊन पोहोचणे. बाकी अलुतेदार/बलुतेदार यांची स्थिती जरा बरी असेल एवढेच पण महारांवर जो आर्थिक आघात झाला त्याचे समाजशास्त्रीय परिणाम येथे विचारात घेणे आवश्यक आहे.
•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°
आरंभकाळ
. चरितार्थासाठी आहे त्या जबाबदार्या पार पाडत मिळेत त्या उत्पन्नात भागत नाही म्हणून अधिकची कामे मिळवणे हा प्रयत्न आजचा सुसंस्कृत माणूसही करतो. गावाच्या एकेक उत्पन्न घटकातून मिळणारा वाटाच कमी झाल्यानंतर अधिकची कामे मिळवणे भाग होते. अशा स्थितीत गाव पातळीवर कोणती कामे मिळनार?
आधीच आपापल्या व्यवसायांत सुस्थिर असलेलल्या जातिघटकांच्या व्यवसायांत त्यांना वाटा मिळणे शक्यच नव्हते.
इतर जातिघटकही पुरेशा उत्पन्नाअभावी अर्धवेळ शेतमजूर असल्याने तेथेही अपवाद वगळता व वर्षातला विशिष्ट काळ वगळता रोजगार मिळणे शक्य नव्हते.
ग्रामरक्षण हीच मुख्य जबाबदारी असल्याने सैन्यात सर्वच जण सहभाग घेण्यास जाऊ शकत नव्हते. यात दुसरी अडचण अशी होती की पगारी सैनिक हा प्रकार शिवाजीच्या काळाचा अपवाद सोडता अस्तित्वातही नव्हता.
•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°
पर्याय
१. गाव सोडून रोजगाराच्या शोधात अन्य प्रांतात जाणे. हा पर्याय मध्ययुगात महार व अन्य जातिघटकांनीही अवलंबिला आहे.
२. गावातच मिळेल ती, कमी प्रतीची का असेनात, कामे मिळविणे. हा पर्याय बहुसंख्य महारांना निवडावा लागला. ग्रामरक्षणाबरोबरच रस्ते स्वच्छ करणे, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे, गावातील मयतांची सरणे रचणे वा खड्डॆ खोदणे अशी कामे अन्य कोणीही करणे शक्य नव्हते आणि म्हणूनच करायला मिळाली ती क्रमश: स्वीकारत जाणे. महारांनी जगण्यासाठी हीसुद्धा कामे करायला सुरुवात केली.
३. इस्लामी आक्रमणानंतर ज्या होत्या त्याही उरल्या-सुरल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांवर गंडांतरे कोसळू लागली होतीच. त्यांची तीव्रता पाच शाह्यांच्या निर्मितीमुळे व सततच्या आपसी संघर्षांमुळे वाढू लागली. त्यात अवर्षणांनीही भर घातली होती, हे आपल्याला तुकाराम महाराजांच्या काही अभंगांवरून कळते. भल्या भल्यांना आपल्या पोरी कुणबिणी/बटक्या म्हणून विकायची वेळ आली होती. गावेच्या गावे ओस पडण्याच्या स्थित्या तर नित्यश: झाल्या होत्या. अशा स्थितीत जर पोशिंदेच पळाले वा दिवाळखोर झाले तर केवळ सेवा हाच व्यवसाय त्या महारांनी जगण्यासाठी मृताहार सुरू केला असेल तर त्यात कसलेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. महारांच्या मृताहाराचे कारण त्यांच्या संस्कृतीत नव्हे तर तत्कालीन अर्थव्यवस्थेत व राज्यव्यवस्थेत आणि मानवाच्या जगण्याच्या अविरत संघर्षात आहे हे येथे लक्षात घ्यायला हवे.
त्यामुळे महारांनी ग्रामरक्षण आणि सरकारी कामांसोबतच शेतकामे, रस्ते साफ करणे, मढी उचलणे, त्यांची विल्हेवाट लावणे, उकिरडे साफ करणे, अशी हलकी (तरी समाजोपयोगी) कामे त्यांना स्वीकारावी लागली कारण अन्य पर्यायच उपलब्ध नव्हते.
जेव्हा अन्नाचीच ददात पडली असेल तेव्हा मृत मांस खाणे त्यांना भाग पडले असेल.
कारण अखिल समाजच जेंव्हा दारिद्र्याच्या खाईत लोटला जातो तेव्हा तो अधिकाधिक कृपण होत जातो आणि आपल्या उत्पन्नातला न्याय्य वाटा इतरांना देण्यात कुचराई करू लागतो हे एक वास्तव आहे. दुष्काळ पडला म्हंऊन धान्याची कोठारे राजाज्ञा टाळत भुकेल्यांसाठी खुले करणारा दामाजीपंत जेव्हा एखादाच असतो तेव्हा तशाच दामाजीपंताला राजक्रोधापासून वाचवून त्याच्या सुटकेसाठी दंड भरणारा एखादाच वि्ठू महार असतो.
एरवीची स्थिती ही जीवो जीवस्य जीवनम् अशी बनून जाते.
परंतु या काळातच धर्मसंस्था सर्वच मानवी जीवन व्यापून उरायला लागली होती. पैठण, काशीच्या ब्राह्मण सभांनी धर्माचे पुरेपूर अपहरण करून स्वार्थप्रेरित धर्मरचना सुरू केली. ज्या बाबी मूळ धर्मात कोठेही निर्दिष्ट केलेल्या नव्हत्या त्या लादायला सुरुवात केली. एका परीने एक ब्राह्मणनिष्ठ नवाच धर्म या काळात नव्याने निर्माण झाला. या काळात पूर्वीच्या राजसत्ता मुस्लिम शासकांच्या चाकर बनलेल्या होत्याच. सरदारकी, पाटिलकी, सरंजामे, देशमुखी इ. ची स्वार्थप्रणित प्राप्ती करण्याची चढाओढ जेंव्हा लागली तेव्हा ब्राह्मण तरी का म्हणून मागे राहतील? परकीय चाकरांना आपल्या समाजाशीच घेणे-देणे राहिले नाही. जहागीर मोगलाईत मिळो की आदिलशाहीत की निजामशाहीत...त्यांना जहागिर्यांशीच मतलब उरले. त्यांचा पराक्रम हा आपल्याच लोकांना लुटण्यात सहभागी झाला. सर्वच मुस्लिमांना यासाठी दोष देता येत नाही.
अशा स्थितीत, जो समाज एवढा हवालदिल झालेला, आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे नागवला जाऊनही त्याच जबाबदार्या झेलणारा...त्याची काय अवस्था झाली असेल?
१३व्या ते १५व्या शतकाच्या दरम्यान त्यांना क्रमश: अस्पृश्य ठरवण्यात आले असावे असे उपलब्ध पुराव्यांवरू अंदाजिता येते. उदा. चोखामेळा या महान संतास विट्ठल मंदिर प्रवेश नाकारला गेला असला तरी तो केवळ आडमुठ्या ब्राह्मण बडव्यांमुळे. पण संत नामदेव त्याला मात्र अस्पृश्य मानत नव्हते आणि अगदी ज्ञानेश्वरांचेही असे अस्पष्ट का होईना संकेत मिळतात. महारांना ५२ हक्कांची सनद १४७५ साली बेदरचा बहामनी बादशहा महंमदशहा (दुसरा) याने दामाजीपंत, पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे वतनदार व १२ बलुतेदारांच्या साक्षीने विठ्या महार यास पातशहाच्या व दामाजीपंतांच्या कामी पडला म्हणून लिहून दिली. (पूर्ण सनदेसाठी पहा-"शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास, ले. अनिल कोठारे.) हिंदू धर्मांधांनी एक महार ब्राह्मण दामाजीच्या कामी आला हे नाकारण्यासाठी (?) "झाला महार पंढरीनाथ"चा घोषा लावला पण ते अनैतिहासिक आहे.
या सनदेत महार अस्पृश्य आहेत असा उल्लेख नाही हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण या सनदेत महारांना जे अधिकचे हक्क मागितले व दिले गेलेले आहेत ते मात्र सर्व महार समाजाचे आहेत. त्या स्थितीतील उपजीविका तरी कायदेशीरपणे टिकून रहावी यासाठी आहे. या सनदीमुळे, महारांचे तात्कालिक हित झाले असेल, पण दूरच्या काळात मात्र हीच सनद त्यांच्या पायातील बेडी बनली..
या सनदेची पार्श्वभूमी मुळात पराकोटीचा दुष्काळ आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. आजच्याही राजकीय मागण्या या वर्तमानातील प्रश्नांशी संबंधित असतात...भविष्यात मंगळावरून कोणी हल्ला केला तर आताच त्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी कोणी करत नाही...केली तरी त्याला वेडगळ म्हटले जाते. उद्या आपल्याला तीन मजली शेती करावी लागेल असे जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा त्याला मूर्खातच काढले जाते. पण कोणत्याही मागण्या या कालसापेक्षच असतात हेच काय ते वास्तव आहे.
या सनदेनुसार गावातील मृत प्राण्यावरचा पहिला आणि एकमेव हक्क महारांचा. कातडीवरील मांगांचा. (मातंग समाज कातडी कमावून स्वतंत्र उपजीविका करतच होते.) बाकी हक्क बलुत्यातील वाट्याबद्दलही आहेत. ते हक्क फारसे पाळले गेलेच नाहीत हे वेगळे. पण मृत प्राण्यावरील हक्क महारांचा अधिकृत आणि राजाज्ञेप्रमाणे झाल्याने एक वेगळी सामाजिक व धार्मिक घटना घडली, ती म्हणजे महार समाज अस्पृश्य ठरवण्यात आला. तत्पूर्वी, अगदी बेदरच्या बादशहाने सनद देईपर्यंत महार हा अस्पृश्य आहे अशी नोंद नाही. कोणत्याही (अगदी १४व्या शतकात लिहिल्या गेलेल्या) स्थलपुराणांतही महार अस्पृश्य आहेत याची नोंद नाही. अंत्यज म्हणजे महार नव्हेत.
परंतु दुर्दैवाने वंशपरंपरागत व्यवसाय पोट भरण्यास अक्षम ठरल्याने आणि अन्य पर्यायांच्या अभावात हीन वाटणार्या सेवा कराव्या लागल्याने ब्राह्मणी धर्मसंस्थांनी महारांना अस्पृश्य ठरवले आणि त्यांचा सामाजिक आणि धार्मिक दर्जाच नष्ट करून टाकला.
तो अमान्य करण्याच्या अवस्थेत तेव्हा महार होते काय? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच येते. तेच काय अन्य काही अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीही त्या विद्रोहाच्या अवस्थेत नव्हत्या. कारण त्याला प्रतिरोध करण्यासाठी जी आर्थिक, मानसिक स्थिती लागते त्या स्थितीत हा समाज होता काय? त्यांच्या लढवैय्या परंपरांचा राजकीय उपयोग करून घेण्यात या काळातील राजसत्ता निरुपयोगी ठरल्या. शिवाजी महाराजांचा अल्प काळ एवढाच अपवाद करता येतो...आणि तोच थोड्या प्रमाणात महार समाजाला आत्मभान देणारा ठरला. परंतु महार समाजाला (आणि अन्य खालच्या मानल्या गेलेल्या जातींना) वेठबिगारी हीही एक नव्य गुलामी ठरली. चोखा मेळ्याचा अंत हा तो वेठीवर वेशीचे काम करत असतांनाच झाला हे सर्वज्ञात आहेच. शिवाजी महाराज ते राजाराम महाराजांच्या काळातच, आणि तीही स्वराज्याच्या कक्षेत, वेठबिगारी बंद होती. अन्यत्र ती कायम राहिली आणि नंतर कथित स्वराज्यातही कायम झाली.
वेठबिगारी ही राज्यसंस्थांच्या आधी आर्थिक भिकारपणातून तसेच नंतर उद्दामतेतूनही निर्माण झालेली अत्यंत शोषक पद्धत. ही तर काही ब्राह्मणांनी निर्माण केली नाही. ती केली तत्कालीन शासक समाजांनी. पण वेठीमुळे जो समाज आधीच गांजला गेलेला होता त्याची अजूनच अवनती घडत गेली. हे महाराष्ट्रीय समाजव्यवस्थेचे एक भीषण अध:पतन आहे.
या काही शतकातच बदललेल्या स्थितीमुळे जो समाज फक्त रक्षण आणि रक्षण हा मंत्र जोपासत एकुणातील समाजाचा, गावांचा, शहरांचा आजच्या पोलिसांप्रमाणे कार्यरत होता, त्याला ढासळलेल्या सामाजिक/आर्थिक स्थितीमुळे हीण दर्जाची कामे करायला भाग पडले. धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर अस्पृश्यतेचा शिक्का मारून अमानवी धर्माचे एक जागतीक उदाहरण घालून दिले. एक पराक्रमी, लढवैय्या समाज रसातळाला नेऊन पोहोचवला. याला स्थिती जशी कारण आहे तशीच सामाजिक मानसिकताही. आज तरी जे गाव-खेडे जतन करून आहेत त्यांने तरी त्यांना मानाचे अभिवादन करावे...
[२]
- ^ लेखक संजय सोनावणीhttp://navshakti.co.in/aisee-akshare/75585/
- ^ लेखक संजय सोनावणीhttp://navshakti.co.in/aisee-akshare/75585/
खरा इतिहास : वाल्मिकी/महार समुदाय हा पूर्वीचा क्षत्रिय
हिमाचल प्रदेश येथील मंडी जिल्ह्यात लेकीच्या सासरी एक लग्नाला गेलो होतो. त्यावेळी राज्यात निवडणुकीचे दिवस होते. साहजिकच होते गप्पा मारताना राजनीती जातीपातीचा विषय निघणारच. हिमाचल प्रदेशात २७ टक्के अनुसूचित जातीचे लोक आहे, पण वाल्मिकी समुदाय २०११ जनसंख्यानुसार अर्ध्या टक्क्याहून कमी याचे कारण काय, हा प्रश्न आला. तिथे एक शाळेचे शिक्षक बसले होते, ते म्हणाले हिमाचल मध्ये मुगल आले नाही. म्हणून वाल्मिकी समुदाय हि नाही. हिमाचल येथे वाल्मिकी समुदाय गेल्या २०० वर्षांत बहुतेक ब्रिटीश लोकांकडे शौचालाय स्वच्छ करण्यासाठी आला आणि इथलाच बनला. मुगल येण्याआधी 'शौचालय साफ करण्याचे कार्य' करणारी कुठलीही जाती भारतात अस्तित्वात नव्हती.
मुगल येण्याच्या पूर्वी आपल्या देशात सकाळी शौचेसाठी लोक जंगलात अथवा दिशा मैदानात जात होते. घरात शौचालय बांधण्याची पद्धत नव्हती. वेद, रामायण, महाभारत किंवा संकृत भाषेतील नाटक, कादंबरी इतकेच नव्हे मनुस्मृतीत 'साफ सफाई' करणाऱ्या कुठल्याही जातीचा उल्लेख नाही. घरची साफसफाई गृहणी करायची आणि राजमहाल इत्यादी ठिकाणी सेवेसाठी सूतपुत्र (राजाची इतर स्त्रियांपासून झालेल्या संतान) होतेच. सैनिक पासून ते मंत्री, रथचालका पासून ते कथा वाचणारे, राज वंशाचे चरित्र सांगणारे सूतच होते. त्यांना अस्पृश्य वागणूक मिळत हि नव्हती. मग प्रश्न येतो वाल्मिकी समुदाय आला कुठून.
मी दिल्लीत बिंदापूर एक्स. येथे राहतो. पूर्वी गावाच्या बाहेर (अर्थात आज एक कोलोनी आहे). हरिजन बस्ती होती. ३० वर्षांपूर्वी बिंदापूर एक्स. कॉलोनी बनल्यावर, कोलोनीच्या सफाईची ठेका सोनू नावाच्या तरुणाने आपल्या नावावर करून घेतला अर्थात स्थानीय नेत्याला पटवून. सध्या सोनुच्या खाली काही कर्मचारी हि कार्य करतात. हरिजन कोलोनीत पंवार, चौहान, वर्मा, सोलंकी, पाल इत्यादी आडनावांच्या पाट्या दिसतात. हि सर्व नावे राजपूत अर्थात क्षत्रियांत आहे. महिना-दोन महिन्यातून घराच्या मागच्या नालीतून गाळ, कचरा इत्यादी काढावा लागतो. माझ्या घरी हातपाय धुवायला पाणी आणि चहा हि त्याला मिळतो. एकदा बोलताना तो सहज म्हणाला, इतर जातीतले लोक आम्हाला चांगली वागणूक देत नाही. चहा हि वेगळ्या कपात देतात. साहेब तुम्ही या भागातले नाही, म्हणून चांगली वागणूक देतात. पण आमचे पूर्वज हि राजपूत होते. त्या काळात युद्धात पराजित राजपूतान्जवळ तीनच पर्याय रहात होते, एक मृत्यूला स्वीकार करणे, धर्म बदलणे किंवा मुगलांची शौच साफ करणे. आमच्या पूर्वजांनी हा तिसरा मार्ग स्वीकारला, पण धर्म बदलला नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत.
पश्चिम दिशेतून येणारे लोक वाळवंटात राहणारे. तिथे दिशा मैदान, तलाव इत्यादी नव्हते. शौच घरातच करायचे. गुलाम लोक ती साफ करायचे. भारतात जाती व्यवस्था होती. प्रत्येक जाती स्वत:चे पारंपारिक कार्य करणारी. इस्लाम कबूल केले तरी ते त्यांचे पारंपारिक कार्यच करणार. मग पराजित क्षत्रियांना या कामावर जुंपले. पुढे मुगलांची घरात शौचालय बांधण्याची पद्धत संपूर्ण भारतात पसरली. राजा महाराजा, जमीनदार, समाजातील प्रतिष्ठीत लोक घरात शौचालय बांधू लागले आणि वाल्मिकी समुदाय विभिन्न नावांनी देशभर पसरला.
महाराष्ट्रात हि पाहाल तर इतर समुदायांची आडनावे महारांत आहेत. ज्या भागांत मुगलांचे जास्त वर्चस्व होते, त्या भागात वाल्मिकी समुदाय हि मोठ्या प्रमाणात आढळेल. देशातील दुर्गम भागात जिथे मुगल पोहचले नाही तिथे वाल्मिकी समुदाय आढळणार नाही.
उत्तर भारतीय ते दक्षिण भारतीय सर्वांचे डीएनए एक असले तरी हि स्वत:ची राजनीतिक पोळी शेकण्यासाठी इतिहासाच्या नावावर थोतांड पसरविण्याचे गेल्या काहीं वर्षांत जोमात सुरु आहे. ते थांबविण्यासाठी वाल्मिकी समाजाला पुन्हा भारतीय समाजात मानाचे स्थान देणे काळाची गरज आहे.
प्रतिक्रिया
उत्तरभारतीय स्वतःला फार उच्च आणि कर्मठ समजतात.
स्त्रीयांना हीन वागणूक देण्यात हरयाणवी आणि उप्र हे आघाडीवर आहेत.
अर्थात मुघल आक्रमकांची फौज तेथेच जास्त काल राहिली त्यामुळे त्यांच्ची वृत्तीही तशीच झालेली आहे.
खरा इतिहास : वाल्मिकी/महार समुदाय हा पूर्वीचा क्षत्रिय
Primary tabs
(भारतीय समाजात जातीभेदाचे विष पसरविण्यासाठी मूळ निवासी युरेशिअन इत्यादी थोतांड इतिहासाच्या नावावर पसरविले जातात. हे पसरविणारे स्वत:ला इतिहासकार इत्यादी म्हणवितात. खर म्हणाल तर आजच्या लोकांचे अध्ययन केले तरी खरा इतिहास कळू शकतो).
हिमाचल प्रदेश येथील मंडी जिल्ह्यात लेकीच्या सासरी एक लग्नाला गेलो होतो. त्यावेळी राज्यात निवडणुकीचे दिवस होते. साहजिकच होते गप्पा मारताना राजनीती जातीपातीचा विषय निघणारच. हिमाचल प्रदेशात २७ टक्के अनुसूचित जातीचे लोक आहे, पण वाल्मिकी समुदाय २०११ जनसंख्यानुसार अर्ध्या टक्क्याहून कमी याचे कारण काय, हा प्रश्न आला. तिथे एक शाळेचे शिक्षक बसले होते, ते म्हणाले हिमाचल मध्ये मुगल आले नाही. म्हणून वाल्मिकी समुदाय हि नाही. हिमाचल येथे वाल्मिकी समुदाय गेल्या २०० वर्षांत बहुतेक ब्रिटीश लोकांकडे शौचालाय स्वच्छ करण्यासाठी आला आणि इथलाच बनला. मुगल येण्याआधी 'शौचालय साफ करण्याचे कार्य' करणारी कुठलीही जाती भारतात अस्तित्वात नव्हती.
मुगल येण्याच्या पूर्वी आपल्या देशात सकाळी शौचेसाठी लोक जंगलात अथवा दिशा मैदानात जात होते. घरात शौचालय बांधण्याची पद्धत नव्हती. वेद, रामायण, महाभारत किंवा संकृत भाषेतील नाटक, कादंबरी इतकेच नव्हे मनुस्मृतीत 'साफ सफाई' करणाऱ्या कुठल्याही जातीचा उल्लेख नाही. घरची साफसफाई गृहणी करायची आणि राजमहाल इत्यादी ठिकाणी सेवेसाठी सूतपुत्र (राजाची इतर स्त्रियांपासून झालेल्या संतान) होतेच. सैनिक पासून ते मंत्री, रथचालका पासून ते कथा वाचणारे, राज वंशाचे चरित्र सांगणारे सूतच होते. त्यांना अस्पृश्य वागणूक मिळत हि नव्हती. मग प्रश्न येतो वाल्मिकी समुदाय आला कुठून.
मी दिल्लीत बिंदापूर एक्स. येथे राहतो. पूर्वी गावाच्या बाहेर (अर्थात आज एक कोलोनी आहे). हरिजन बस्ती होती. ३० वर्षांपूर्वी बिंदापूर एक्स. कॉलोनी बनल्यावर, कोलोनीच्या सफाईची ठेका सोनू नावाच्या तरुणाने आपल्या नावावर करून घेतला अर्थात स्थानीय नेत्याला पटवून. सध्या सोनुच्या खाली काही कर्मचारी हि कार्य करतात. हरिजन कोलोनीत पंवार, चौहान, वर्मा, सोलंकी, पाल इत्यादी आडनावांच्या पाट्या दिसतात. हि सर्व नावे राजपूत अर्थात क्षत्रियांत आहे. महिना-दोन महिन्यातून घराच्या मागच्या नालीतून गाळ, कचरा इत्यादी काढावा लागतो. माझ्या घरी हातपाय धुवायला पाणी आणि चहा हि त्याला मिळतो. एकदा बोलताना तो सहज म्हणाला, इतर जातीतले लोक आम्हाला चांगली वागणूक देत नाही. चहा हि वेगळ्या कपात देतात. साहेब तुम्ही या भागातले नाही, म्हणून चांगली वागणूक देतात. पण आमचे पूर्वज हि राजपूत होते. त्या काळात युद्धात पराजित राजपूतान्जवळ तीनच पर्याय रहात होते, एक मृत्यूला स्वीकार करणे, धर्म बदलणे किंवा मुगलांची शौच साफ करणे. आमच्या पूर्वजांनी हा तिसरा मार्ग स्वीकारला, पण धर्म बदलला नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत.
पश्चिम दिशेतून येणारे लोक वाळवंटात राहणारे. तिथे दिशा मैदान, तलाव इत्यादी नव्हते. शौच घरातच करायचे. गुलाम लोक ती साफ करायचे. भारतात जाती व्यवस्था होती. प्रत्येक जाती स्वत:चे पारंपारिक कार्य करणारी. इस्लाम कबूल केले तरी ते त्यांचे पारंपारिक कार्यच करणार. मग पराजित क्षत्रियांना या कामावर जुंपले. पुढे मुगलांची घरात शौचालय बांधण्याची पद्धत संपूर्ण भारतात पसरली. राजा महाराजा, जमीनदार, समाजातील प्रतिष्ठीत लोक घरात शौचालय बांधू लागले आणि वाल्मिकी समुदाय विभिन्न नावांनी देशभर पसरला.
महाराष्ट्रात हि पाहाल तर इतर समुदायांची आडनावे महारांत आहेत. ज्या भागांत मुगलांचे जास्त वर्चस्व होते, त्या भागात वाल्मिकी समुदाय हि मोठ्या प्रमाणात आढळेल. देशातील दुर्गम भागात जिथे मुगल पोहचले नाही तिथे वाल्मिकी समुदाय आढळणार नाही.
उत्तर भारतीय ते दक्षिण भारतीय सर्वांचे डीएनए एक असले तरी हि स्वत:ची राजनीतिक पोळी शेकण्यासाठी इतिहासाच्या नावावर थोतांड पसरविण्याचे गेल्या काहीं वर्षांत जोमात सुरु आहे. ते थांबविण्यासाठी वाल्मिकी समाजाला पुन्हा भारतीय समाजात मानाचे स्थान देणे काळाची गरज आहे.


प्रतिक्रिया
19 Nov 2018 - 6:03 pm | विजुभाऊ
हे सगळे उत्तर भारतीय जात पात सोडायला तयार नाहीत.
उत्तरभारतीय स्वतःला फार उच्च आणि कर्मठ समजतात.
स्त्रीयांना हीन वागणूक देण्यात हरयाणवी आणि उप्र हे आघाडीवर आहेत.
अर्थात मुघल आक्रमकांची फौज तेथेच जास्त काल राहिली त्यामुळे त्यांच्ची वृत्तीही तशीच झालेली आहे.
19 Nov 2018 - 8:23 pm | ईश्वरदास
पराजित राजाच्या आप्तेष्टांना हीन दर्जाची कामे करण्याची शिक्षा मिळे, हे पटण्यासारखे आहे,
आम्ही लहान असताना आमची आत्याबाई आम्हाला राजपुत्र, राक्षस, राजा, जादुगार टाइप कथा सांगत असे, पण बहुतेक कथेचा शेवट हा खलपात्राला नगरातील लोकांचे मलमुत्र भक्षण करणे, साफ करणे, किंवा मृत्यु दंड असा असे.
म्हातारी च्या कथा वर्षानुवर्षे चालत आलेल्या लोककथा असतील असं मानलं, तर या आधारावर हे कधी तरी नक्कीच घडलेलं असेल,
आता राहीला मुद्दा मुघलांचा, तर इथं जे वाईट झालं ते त्यांच्या मुळेच, असं म्हणण्यात अर्थ नाही.आपले लोक काही कमी नव्हते.
जातिंची विभागनी
कर्माने पडलेल्या, शिक्षेने मिळालेल्या आणि मुळ वर्ण अशी असावी.
धाडसी जात .....
महार ही १२ बलुतेदार पैकी एक
अतिशय शूर आणि धाडसी जात
होती / आहे.
कही ठिकाणी( watch man )
असा ही उल्लेख आहे. गावाचे / गटाचे
संरक्षण करणे या कामासाठी शुर
वीर महार तरुण प्रसिद्द होते
आणि हेच त्यांचे मुख्य काम होते. ९६
कुळी मधे सुद्धा २४ कुळी नागवंशी
या महार आहेत असे
माझ्या वाचनात आले होते ( सन्दर्भ
आठवत नाहीये )
बाबासाहेबांच्या
आधी महात्मा फुलेनी त्यांच्या शिवाजी महाराजांच्या पोवाडयत
महार समाजाबद्दल,
ही कशी इथली मूळ जात आहे
आणि महार लोक कसे निडर,
स्वाभिमानी आणि बिनधास्त
होते या बद्दल बरेच लिहिले
आहे ...त्यांच्या कही ओळी इथे
देतो.ज्यात ते क्षत्रिय म्हणजेच महार
असे लिहितात ...
"
अति महारथी क्षत्रियाचा बाळ
|| यावानाचा काळ
त्रेतायुगी || १ ||
स्वभावे तो शुर रणी भिडणार ||
लढे अनिवार देशासाठी || २ ||
परशरामासी झोंबे महाबळी ||
एकवीस वेळी लागोपाठ || ३ ||
अशा महावीरा म्हणे महाअरी ||
धाके थरथरी द्विजसूत || ४ ||
महात्मा फुलेंच्या प्रत्येक ग्रंथात
महार या समाजाबद्दल
आत्मीयता आणि त्यांच्यावर
झालेल्या अत्याचाराचे दर्शन
दिसून येते. आपल्या प्रत्येक
लिखाणात ते महार समाजाचे
गोडवे गातात .....
छत्रपति शिवाजी महाराजांच्या दरबारी आणि स्वकीय
बरेच महार होते,
महाराजानी या जातीच्या लोकाना विश्वासाचे
मानून महत्वाचे कामे दिले होते.
महार जाती बद्दल
महाराजाना फार आदर
होता ..अगदी त्यांचा अंग रक्षक
महार जातीचा होता ( जीव
महाले )
शिवाजी
महाराजांच्या बाबतीत महार
शब्द नेहमी येतो मग
तो महाराजांचे रक्षण
करणारा जीवा महाले असो,
संभाजी महाराजांचे अंतिम
संस्कार करणारे महार असो ,
जिजाऊ ची समाधी महार
वाड्यात
बांधनारे धाडसी महार
असो ....या जातीचा आणि महाराजांचा निकटचा संबंध
होता असे दिसून येते ...असो
संत नामदेव
चोखा मेळाला गुरूस्थानी मानत
असत. मात्र अशी नोंद
कोणत्याही इतिहासकराने
का केलि नाही ? याचे कारण
चोखामेळाची जात होय. महार
जातीचा व्यक्ति गुरु होऊ शकत
नाही हा
मनुचा कायदा लोकांच्या डोक्यात
फिट बसवाला होता / आहे . पण
नामदेवांच्या एक अभंगावारून काय
स्पष्ट होते ते तुम्हीच पहा
" माझा डोळा चोखामेळा
माझा भाव चोखामेळा
माझी भक्ति चोखामेळा
माझा देव चोखामेळा
चोखामेळा माझे सर्वकाही ||
( संत नामदेव )
असे हे महार ..शूर , धाडसी ,
स्वाभिमानी , बिनधास्त ,
प्रमाणिक , देशप्रेमी विशेषण
कमी पडतील ..
या राज्याचे भूमि पुत्र
आणि प्राचीन राज्यकर्ते असल्याने
या राज्याला
महार - राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र
हे नाव पडले आहे असे बरयाच
विचारवंतानी सांगितले आहे पण
कर्मठ हिन्दू हे मानी कसे
करणार ? महाराष्ट्रा पक्ष क्षेत्रफळ
आणि लोकसंख्या जास्त
असलेल्या कुठल्याही राज्याला महा हा शब्द
लागलेला नाही मग फ़क्त
महाराष्ट्राला कसा लावला जातो असे
विचारले तर अगदीच मिळमिळ
उत्तरे देतात
महाराष्ट्र हे नाव सर्वात प्रथम
या राज्याचे नागरिक असलेले
महार राज्यकर्ते
( the name maharashtra was given to
the kingdom established by the
Mahar
rulers.....Mahar Rashtra. )
यांच्या मुळे लाभलेले आहे हे
निर्विवाद सत्य आहे.