निझामकालिन आडासंबंधीचा इतिहास सांगू शकाल काय?
ही आमचे गावातील ( रत्नापूर,ता.परंडा.जि.उस्मानाबाद) दोन निजामकालीन आड आहेत.
त्यावर अनुक्रमे,
H.E.H NIZAM'S - WSD PIN 242 1354-F D- 31 व
H.E.H NIZAM'S - WSD PIN 245 1354-F D- 47 असा उल्लेख आहे.
ही PIN सिरियल नंबर अथवा Postal Index Number असं ग्रहीत धरायचं झालं तर, एकाच गावात 242 नंतर थेट 45 कसं काय येऊ शकतं?
243, 244 दुसऱ्या गावात कसे काय आहे? शिवाय D- 31 नंतर थेट 47 कसं काय आलं.
हे आड इंग्रजीमध्ये NIZAM'S लिहील्याने, एक मात्र स्पष्ट होतं, की हे आड निझामकालीन आहेत. आणि आमुच्याकडे प्रत्येक गावामध्ये दोन दोन आड आहेत. कांही गावात एकच आड आहे. हे.आमच्या गावात 3 रहाट असलेला पंचकोनी आड आहे.तर आमच्या गावापासून 4 कि.मी अनाळा या गावात खुपच मोठा आड आहे.
पंचकोणी आकारातील आड फक्त निजाम शाषित भागात आहेत काय?ते कोणी बांधले? कालखंड काय?सुरूवात कोठून शेवटी कुठे? असे एकूण किती आड बांधले असतील?या सर्व प्रश्नांची उकल होणं गरजेचं आहे.
विशेष म्हणजे कडक दुष्काळातही या चार पाच घागरी पाणी नाही म्हणलं तरी निघतेच निघते.
यावरील मजकुराचा अर्थ काय, यावरील माझे वैयक्तिक मत. अर्थात माझ्या सुमार लेखणीतून तुम्ही माझ्या ऐतिहासिक ज्ञानाच्या पातळीचा अंदाज लावू शकता.
असो.
⭕प्रत्येक आडांची रचना एकसारखीच आहे.
⭕ सर्रास नदीच्या, ओढयाच्या, पांदीच्या, आणि गावाच्या थोडंस बाहेरच हे आड बांधले गेल्याचे दिसून येते.
⭕ फक्त माझ्याच असं सुपिक डोक्यात आलं की, हे आड जुन्या वडाच्या, पिंपळाच्या कांहीशा अंतरावर बांधले गेलेले आहेत.
⭕यावरील लिहीलेल्या H.E.H NIZAM'S चा अर्थ (माझ्यामते) हुजूर-ए- हैद्राबाद निझाम असा असावा. अथवा निझामच्या इंग्रजी विकीपिडियाप्रमाणे His Exalted Highness of Nizams म्हणजेच निझामाचे औदार्य, उदारतेतून ( थोडक्यात निझाम चॅरिटेबल ट्रस्ट) मधून बनवलेले असावेत.
आता WSD चा अर्थही मी ढोबळमानाने Water Supplier Department असा लावून मोकळा झालो.
आता उरले PIN ही बहुतेक पिनकोड असावा.
त्याखाली 1354 - Fम्हणजे निझामी फसली 1354 सालातील असावं.
फसली म्हणजे कृषी वर्ष हे O1 जुलैपासून प्रारंभ होऊन 30 जुनला संपते.जलालुद्दीन मुहम्मद अकबर भारताचा तिसरा मुघल सम्राट होता. वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी सम्राट बनलेल्या अकबराला राज्यकारभार सांभाळत असताना असं वाटलं.
अशी कोणती तरी एखादी कालगणना हवी,साल हवे, संवत् हवं जे पिकांवर म्हणजे फसलवर आणि ऋतूंवर आधारीत असावं. त्या हिजरी सालासारखं चंद्रमासाप्रमाणे घटणारी नसावं, आणि हिंदूच्या विक्रम संवत पेक्षा चांगलं असावं.
आणि मग अकबराने म्हणे, इ.स 1555 पासून म्हणजे त्याच्या सिंहासनारुढ, राज्याभिषेक वर्षापासून नव्या सालाची म्हणजेच फसली वर्षाची सुरुवात केली. त्यावेळी हिजरी साल होते 963. यावरुन स्पष्ट समजेल की,इसवी सन आणि फसली यामध्ये सुमारे 592,593 वर्षांचा फरक असतो म्हणजेच 1354 + 592 = 1946,47 मधील हे आड असावेत.
आणि 1946चा काळ म्हणजे आम्हाला स्वातंत्र मिळायच्या दोन वर्ष आधी बांधण्यात आलेला असण्याची शक्यता आहे.
मीन उस्मान अली खान सिद्दीकी, असफ जाह सातवा ' हा हैदराबाद आणि बरारचा शेवटचा निजाम होता. ते 1911 आणि 1948 दरम्यान त्यांनी हैदराबादवर राज्य केले।26 जानेवारी 1950 रोजी ते हैदराबाद चा राज्यप्रमुख म्हणून राज्य बनले. त्याला "निझाम सरकार" किंवा "हजूर-ए-निजाम" म्हणतात. याच्याच कार्यकाळात ते आड बांधले असावेत.
माझ्यासारख्या नवख्या अभ्यासकाला इतिहासाची उकल करणं, जड जातेय. त्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य अपेक्षित आहे.
धन्यवाद.
सुमित रवि सरवदे.
Comments
Post a Comment