माझे दोन शब्द.
महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या 'शेतकऱ्याचा आसूड आणि इशारा' या पुस्तकाच्या उपोदघातात लिहिले आहे कि, "सांप्रत शेतकरी म्हटला म्हणजे त्यात तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी आणि धनगर.
आता हे तीन भेद होण्याचे कारण पाहिले असता मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी किंवा कुणबी; जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागायती करू लागले, ते माळी व जे हे दोन्ही करून मेंढरे, बकरी वगैरेंचे कळप बाळगू लागले, ते धनगर.
असे निरनिराळ्या कामांवरून हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आता या तीन जाती पृथक जातीच मानतात."
Comments
Post a Comment