शके 1676 मधील शिलालेखाचे वाचन होणे गरजेचे वाटते?


                 

               याचे मी जसेच्या तसे काढलेली नक्कल

रत्नापूर ता. परंडा.जि. उस्मानाबाद निजाम राजवटी खालील असलेले तत्कालीन पलियांडा,प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर, पलिखंड,पालांडा, परिंडा करत आताचे परंडा असे असलेल्या तालुक्यात रत्नापुर येथे ही शिलालेख आहे. शेजारी बिरोबाचे पुरातन मंदिर आहे. 

काळभैरवनाथाची सोनारी (माकडाची सोनारी) पासून १० कि.मीवर रत्नापूर- मलकापूर जोडगावे आहेत. (परंडा -पाथरुड रोड)

परंडा हे पुर्वी निजाम सरकारची मोठी राजधानी होती. मुनिमखान औरंगाबादीच्या एका पत्रानुसार मोगल काळात परंडा जिल्ह्यात १९ तालुके व ६२१ गावांचा समावेश होता. सुस्थितीत असलेला येथिल भुईकोट किल्ला अनेक रहस्य आपल्या पोटात घेऊन दिमाखात उभा असल्याचे दिसते.

रत्नापूर येथे जुन्या वाडयांवर अनेक चिन्हे कोरलेली आहेत. परंतु यापेक्षाही जास्त कुतुहल मला येथिल दोन शिलालेखांचेच आहे.

शके१६७६ नाम संवंतर यापुढे मलाही कांही समजेना एकूण १५ते१६ ओळीच एक शीलालेख तर अडीज ओळींची दुसरी शिलालेख कान्होबाच्या माळावर आहे.

या कान्होबाच्या माळावर असलेल्या शिलालेखाचा मी पाहणी करत असलेला सुगावा माझे आजोबा कै. अजिनाथ अर्जुन सरवदे यांना लागताच माझ्यावर रागवले.

जागा चांगली नाही. या त्यांच्या नेहमीच्या उत्तराला मी पुरता वैतागलो होतो.

म्हणून तिथे वारंवार जाऊन त्या दिवशी मी आजोबांना बोलते केले. १४ ऑगस्ट२०१३ ला मी इतिहासाची फक्त आवड असल्यानं पुरावे गोळा करण्याचा छंद जोपासू लागलो.

आजोबांव्यतिरिक्त त्यांच्या समवयस्क लोकांच्या मुलाखतीही मी घेतल्या, रेकॉर्ड केल्या. परंतु दुर्दैवाने प्रवासात कुठेतरी गहाळ झाल्या.

कान्होबाचा माळ

याविषयी आमुचे आजोबा सांगायचे की भावकीतल्या साधू सुदाम सरवदे यांचे मेव्हणे मारूतीबुवा वंजारे,बीड हे जुने शिक्षित, सुसंस्कृत ग्रहस्थ पोथी पुराणे यांचे वाचन करणारे. नित्यनियमित गुजराच्या (गुज्जर) विहिरीवर अंघोळीला जायचे.

एकदा अंघोळ करत असताना त्यांना विहिरीतून कान्होबाच्या माळावर साधारण एक कि.मीचा रस्ता असल्याचे दिसले. शिवाय तसा उल्लेख असलेला मजकूर या विहिरीवर अथवा जवळपास त्यांना वाचायलाही मिळाला.

त्यांनी कान्होबांच्या माळावर गेल्यावर तिथे एका शिळेवर लिहिलेला मजकूर वाचला तेंव्हा त्यांना जाणवले की तो मजकूर बदलतो आहे. आणि क्षणात ती शिळा पलटी होऊन त्याखाली तळघरात जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या.

मारूतीबुवा तळघरात गेले. तिथे त्यांना अफाट धनदौलत असलेले मोठ्ठाले हंडे, पेटया दिसल्या, ऋणीमूनी दिसले. शिवाय दोन स्त्रिया ज्यांची नावे रत्निका ( रत्ना ) आणि मल्लिका स्वागत करताना दिसल्या.

मारूतीबुवा आणि त्यांच्यात संवाद झाला. मारूतीबुवा अत्यंत भयभित होऊन अंघोळ केली नसल्याचे शिवाय मटन खाल्याचे कारण सांगून त्या तळघरातून बाहेर आले.

पुढे सहा महिने ते आजारी पडले. आणि रक्ताची गुळणी (उलटी) होऊन मरण पावले. विशेष म्हणजे या गोष्टीला गावातले आजोबांच्यावयाचे सर्वजण दुजोरा देतात.

निश्चित कोणती शिळावरील लेख मारूतीबुवा यांनी वाचला हे सांगता येणार नाही परंतु मी स्वतः तिथे पाहिले तेंव्हा अडीज ओळी असलेला दगड आढळला. शिवाय तो आम्ही दोघांनी उचलूनही पाहिला ना रस्ता ना तळघर.

               या दगडावरील दिड ओळी मजकूर

माझी खुप इच्छा होती यावर योग्य ते संशोधन व्हावे. परंतु या अनाकलनीय भाषेचा अडसर मध्ये येत होता. गावाचा इतिहास डोळयांपुढे असूनही वाचता येत नाहीय याचेच वाईट वाटते.

सहकार्य अपेक्षित.

आपलाच,

सुमित रवि सरवदे.


Comments

Popular posts from this blog

रत्नापूर गावातल्या शिलालेखासंबंधी संशोधन होणे गरजेचे

महार

इनाम आणि वतन जमिनी